January 16, 2025 2:11 PM January 16, 2025 2:11 PM
11
संशयित आरोपीने केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी
पश्चिम बंगालमध्ये काल एका संशयित आरोपीने केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. या संशयितासह इतर दोघांना राजगंज इथल्या सुधारगृहात नेत असताना त्यानं पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली आणि त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.