June 26, 2024 7:58 PM June 26, 2024 7:58 PM
8
नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण: झारखंड मधल्या ओएसिस शाळेच्या मुख्याध्यापकाची सीबीआय चौकशी
नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआय पथकानं आज झारखंड मधल्या हजारीबाग इथल्या ओएसीस शाळेत चौकशी सुरु केली. शाळेचे मुख्याध्यापक अहसनुल हक याना या पेपरफुटीबाबत पथकानं प्रश्न विचारले. फुटलेल्या प्रश्नपत्रिकेच्या वाहतुकीत प्रमाण कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात आला नसल्याचं मुख्याध्यापकांनी सांगितलं. नीट परीक्षेसाठी हे मुख्याध्यापक शहर समन्वयक म्हणून काम पाहत होते.