October 8, 2024 3:12 PM October 8, 2024 3:12 PM

views 8

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी पोहोचला उच्चांकी पातळीवर

मागच्या काही दिवसांच्या पडझडीनंतर आज दुपारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी उच्चांकी पातळीवर पोहोचले. सेन्सेक्स ३६६ अंकांनी वाढून ८१ हजार ४१६ अंकावर पोहोचला. तर निफ्टी १३१ अंकानी वाढून २४ हजार ९२७ अंकावर पोहोचला.

September 30, 2024 7:31 PM September 30, 2024 7:31 PM

views 9

देशातल्या शेअर बाजारात जोरदार घसरण

गेल्या कित्येक दिवसांपासून उच्चांकी पातळी गाठत असलेल्या देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार घसरण दिसून आली. व्यवहार सुरू झाले तेव्हापासून सुरू झालेली ही घसरण सातत्याने वाढत गेली. सेन्सेक्स दिवसअखेर १ हजार २७२ अंकांनी घसरुन ८४ हजार ३०० अंकांवर आणि निफ्टी ३६८ अंकांनी घसरुन २५ हजार ८११ अंकांवर बंद झाला.  आशियाई बाजारातल्या घसरणीचा परिणाम देशातल्या शेअर बाजारांवर दिसून येतोय. विदेशी संस्थांत्मक गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या विक्रीचा फटकाही बाजाराला बसला. 

September 23, 2024 7:14 PM September 23, 2024 7:14 PM

views 15

शेअर बाजारामधल्या व्यवहारांमध्ये दिवसभरात तेजी

शेअर बाजारामधल्या व्यवहारांमध्ये दिवसभरात तेजी दिसून आली. सकाळच्या सत्रातच शेअर बाजारानं आतापर्यंतचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. दुपारच्या सत्रातही तेजी कायम राहिली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३८४ अंकांची वाढ नोंदवत ८४ हजार ९८० अंकांच्या नवा उंचीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही१४८ अंकांची वाढ नोंदवत २५ हजार ९३९ अंकांच्या विक्रमी उंचीवर बंद झाला. 

August 26, 2024 7:18 PM August 26, 2024 7:18 PM

views 8

शेअर बाजारात तेजी, निफ्टी पुन्हा २५ हजाराच्या वर

भारतीय शेअर बाजारांमध्ये आज तेजी पाहायला मिळाली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनं २५ हजाराचा टप्पा पुन्हा ओलांडला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज ६१२ अंकांची वाढ  झाली आणि तो ८१ हजार ६९८ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी १८७ अंकांची वाढ नोंदवत २५  हजार ११ अंकांवर बंद झाला.

July 29, 2024 1:47 PM July 29, 2024 1:47 PM

views 9

शेयर बाजारात आज सकाळच्या सत्रात नव्या उच्चांकाला स्पर्श

भारतीय शेअर बाजार सकाळच्या सत्रात विक्रमी तेजीवर उघडला.  सुरुवातीलाच सेन्सेक्सनं ८१ हजार ७४९ चा तर  निफ्टीनं २४ हजार ९८० चा आतापर्यंतचा उच्चांक गाठला. छोट्या तसंच मध्यम शेअर्समध्येही तेजीचा परिणाम दिसून येत आहे. अमेरिकन शेअर बाजारानं शुक्रवारी बंद होताना सकारात्मक तेजी गाठली होती. सर्व आशियाई शेअर बाजारात तेजीचा प्रभाव दिसून येत आहे.

July 4, 2024 12:16 PM July 4, 2024 12:16 PM

views 11

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २४ हजारांपार

भारतीय शेअर बाजारांनी आज पुन्हा विक्रमी पातळी गाठली. व्यवहाराच्या सुरुवातीला मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने ११४ अंकांची वाढ नोंदवत ८० हजारांची पातळी ओलांडली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ३९ अंकांची वाढ नोंदवत २४ हजारांपार गेले.

June 18, 2024 7:34 PM June 18, 2024 7:34 PM

views 27

देशातल्या दोन्ही शेअर बाजार आज विक्रमी पातळीवर बंद

देशातल्या दोन्ही शेअर बाजार आज विक्रमी पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स पहिल्यांदाच ७७ हजारांच्या वर आणि निफ्टीही पहिल्यांदाच २३ हजार ५०० अंकांच्यावर स्थिरावला. व्यवहार सुरू झाले तेव्हापासून सेन्सेक्स ७७ हजारांच्या आणि निफ्टी २३ हजार ५०० च्या वर व्यवहार करत होते. दिवसभर बाजारात हे सातत्य कायम राहिलं आणि दिवसअखेर सेन्सेक्स ३०८ अंकांची तेजी नोंदवून ७७ हजार ३०१ अंकांवर स्थिरावला.  निफ्टी ९२ अंकांची तेजी नोंदवून २३ हजार ५५८ अंकांवर बंद झाला. मतमोजणीच्या दिवसापासून अवघ्या ८ सत्रांमध्ये सेन्सेक्सनं ५ हजारा...