October 10, 2024 2:23 PM October 10, 2024 2:23 PM

views 5

महान उद्योगपती रतन टाटा यांचं दीर्घ आजारानं निधन, आज संध्याकाळी मुंबईत अंत्यसंस्कार

ज्येष्ठ उद्योगपती, टाटा सन्सचे मानद अध्यक्ष आणि टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांचं काल रात्री मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आलं होतं. उपचारांदरम्यान काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचं पार्थिव सध्या मुंबईच्या एनसीपीए इथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. सायंकाळी वरळीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राज्य सरकारनं टाटा यांच्या सन्म...

October 8, 2024 3:05 PM October 8, 2024 3:05 PM

views 7

ज्येष्ठ पत्रकार, चित्रपट समिक्षिका आणि लेखिका नीला उपाध्ये यांचं निधन

ज्येष्ठ पत्रकार, चित्रपट समिक्षिका आणि लेखिका नीला उपाध्ये यांचं काल रात्री मुंबईत चेंबुर इथं निधन झालं. त्या ७९ वर्षांच्या होत्या. चेंबुरच्या चरई विद्युत दाहिनीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

September 28, 2024 9:06 AM September 28, 2024 9:06 AM

views 8

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं काल धुळे इथं वार्धक्यानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार करण्यात येतील. रोहिदास पाटील यांनी धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली; त्यानंतर 1980 मध्ये ते तत्कालीन कुसुंबा आणि आताच्या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग सहावेळा त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. विविध खात्यांचं मंत्रीपद त्यांनी भूषवलं. रोहीदास पाटील यांच्...

September 27, 2024 7:18 PM September 27, 2024 7:18 PM

views 3

माजी मंत्री आणि काँग्रेस नेते रोहिदास पाटील यांचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ  नेते आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं आज पहाटे धुळे इथं वार्धक्यानं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.   रोहिदास पाटील यांनी सन १९७२ मध्ये धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून पहिल्यांदा निवडून येत राजकारणात प्रवेश केला. १९८० मध्ये तत्कालीन कुसुंबा आणि आताच्या धुळे ग्रामीण विधान सभा मतदारसंघात आमदार म्हणून ते निवडून आले आणि त्यानंतर सलग ६ वेळा त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. १९८६ ते १९८८ या...

September 24, 2024 4:58 PM September 24, 2024 4:58 PM

views 8

ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, कामगार आणि शिक्षक संघटना नेते डॉ.शरद कळणावत यांचं निधन

यवतमाळ इथले ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, कामगार आणि शिक्षक संघटना नेते डॉ. शरद कळणावत यांचं आज सकाळी निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. शरद कळणावत यांनी नागपूर आणि अमरावती दोन्ही विद्यापीठांमध्ये कार्यकारी मंडळ आणि विद्वतसभा सदस्य, अधिष्ठाता, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून जबाबदाऱ्या पार पडल्या. अमरावती विद्यापीठाची पहिली डॉक्टरेट त्यांना मिळाली होती. उच्च शिक्षण क्षेत्रातला राज्य शासनाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला होता. नुटा या प्राध्यापक संघटनेचे आणि महाराष्ट्र प्राध्यापक संघटने...

August 10, 2024 8:36 PM August 10, 2024 8:36 PM

views 10

ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांचं दीर्घ आजारानं निधन

  ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. काही काळापूर्वी त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर मुंबईतल्या ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी विविध भूमिका केल्या. १९८० आणि ९०च्या दशकात त्यांनी रंगभूमीवर केलेल्या विनोदी भूमिका प्रचंड गाजल्या. प्रायोगिक रंगभूमीवरुन कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या कदम यांनी टुरटूर या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगमंचावर पदार्पण केलं. विच्छा माझ...