June 20, 2025 1:34 PM June 20, 2025 1:34 PM

views 2

ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन

मराठी मनोरंजन सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं काल निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. उमदं देखणं व्यक्तिमत्व आणि प्रभावी आवाज याच्या जोरावर त्यांनी रंगमंच आणि रुपेरी पडद्यावर अनेक भूमिका रंगवल्या. लेखन, दिग्दर्शन क्षेत्रातही त्यांनी काम केलं. शिवाय संगीतातही त्यांची रुची होती. त्यांच्या निधनानं मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

June 13, 2025 2:04 PM June 13, 2025 2:04 PM

views 13

प्रसिद्ध उद्योजक संजय कपूर यांचं निधन

प्रसिद्ध उद्योजक संजय कपूर यांचं हृदयाच्या तीव्र झटक्यामुळे निधन झालं. ते 53 वर्षांचे होते. लंडन इथं पोलो खेळत असताना कपूर यांना मधमाशीने डंख मारला. त्यामुळे त्यांना श्वसनाची गंभीर समस्या जाणवू लागली. त्यानंतर हृदयावर ताण आल्यामुळे त्यांचं निधन झालं. प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचा 2003 साली विवाह झाला होता. त्यानंतर 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.  

April 15, 2025 2:56 PM April 15, 2025 2:56 PM

views 1

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक ग.दि.कुलथे यांचं निधन

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक ग.दि.कुलथे यांचं काल नवी मुंबईतल्या राहत्या घरी हृदयविकाराने निधन झालं. ते ८७वर्षांचे होते. राज्य शासकीय राजपत्रित अधिकारी संघाचं त्यांनी प्रदीर्घकाळ नेतृत्व केलं. त्यांनी स्थापन केलेली ही संघटना राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी आपापली गाऱ्हाणी मांडण्याकरता उपयुक्त व्यासपीठ ठरलं. सेवानिवृत्तीनंतरही ते संघटनेचे सल्लागार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पार्थिवावर नेरुळ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशासनात पारदर्शकता, संवेदनशीलता, आणि जबाबदारी...

April 9, 2025 3:03 PM April 9, 2025 3:03 PM

views 9

आचार्य विनोबा भावे यांच्या अनुयायी कालिंदीताई यांचं निधन

आचार्य विनोबा भावे यांच्या अनुयायी कालिंदीताई यांचं नुकतंच पवनार आश्रमात निधन झालं. त्या ९४ वर्षांच्या होत्या. कालिंदीताई विनोबांच्या भूदान पदयात्रेत सहभागी झाल्या. कालिंदीताईंच्या दैनंदिनीच्या आधारे लिहिले गेलेलं 'विनोबांची पूर्व पाकिस्तान भूदान-पदयात्रा' हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. पवनार आश्रमातून प्रकाशित होणाऱ्या 'मैत्री' मासिकाच्या त्या दीर्घकाळ संपादक होत्या. विनोबांच्या अनेक पुस्तकांचं त्यांनी संपादन केलं.

April 5, 2025 8:23 AM April 5, 2025 8:23 AM

views 9

ज्येष्ठ चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन; आज मुंबईत अंत्यसंस्कार

हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते मनोज कुमार यांचं काल सकाळी मुंबईत निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी अकरा वाजता मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. मनोज कुमार यांचं मूळ नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी असं होतं; मात्र देशभक्त नायक म्हणून त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांमुळे भारतकुमार हे टोपणनाव त्यांना मिळालं. वो कौन थी, शहीद, रोटी कपडा और मकान, क्रांती, पूरब और पश्चिम, उपकार हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. भारतीय चित्रपटसृष्ट...

April 5, 2025 4:05 PM April 5, 2025 4:05 PM

views 1

प्रसिद्ध अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचं मुंबईत निधन

ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचं काल मुंबईत निधन झालं. ते ६२ वर्षांचे होते. काही वर्षांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचाही त्रास जाणवू लागल्याने त्यांची प्रकृती खालावत गेली. उजवणे यांनी विविध चित्रपट आणि नाटकांसह, वादळवाट, चार दिवस सासूचे, दामिनी यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

February 11, 2025 1:17 PM February 11, 2025 1:17 PM

views 5

बोराडे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

बोराडे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. बोराडे यांच्या निधनानं सिद्धहस्त लेखक आणि प्रतिभावान साहित्यिक हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. बोराडे यांच्या जाण्यानं साहित्यातली शहरी आणि ग्रामीण भागाची नाळ तुटली असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. बोराडे यांच्या निधनाबद्दल सर्वत्र विशेषतः साहित्य वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  

February 11, 2025 1:10 PM February 11, 2025 1:10 PM

views 7

ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा रं बोराडे यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा रं बोराडे यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्धक्याने निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्यावर गेले काही दिवस रुग्णालयात उपचार सुरु होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथल्या महाविद्यालयात प्राध्यापक आणि नंतर परभणी इथल्या शिवाजी महाविद्यालयात प्राचार्य पदाची जबाबदारी सांभाळणारे बोराडे यांचा ‘पेरणी’ हा पहिला कथासंग्रह १९६२ साली पुण्याच्या कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने प्रसिद्ध केला होता. त्यांची ‘पाचोळा’ ही कादंबरी विशेष गाजली. याशिवाय ‘तलफ’, ‘बुरूज’, यांसारख्या अ...

February 7, 2025 1:13 PM February 7, 2025 1:13 PM

views 3

कामेश्वर चौपाल यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्र्यांकडून शोक व्यक्त

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाल यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. चौपाल हे समर्पित रामभक्त होते, ज्यांनी अयोध्येतल्या राम मंदिराच्या उभारणीत मोलाचं योगदान दिलं. समाजाच्या वंचित घटकाच्या कल्याणासाठी केलेल्या कामामुळे ते सदैव स्मरणात राहतील, असं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.  

February 6, 2025 7:20 PM February 6, 2025 7:20 PM

views 10

ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं निधन

ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक आणि लेखक द्वारकानाथ संझगिरी यांचं आज मुंबईत निधन झालं ते ७४ वर्षांचे होते. गेले काही दिवस त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार चालू होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या मुंबईतल्या शिवाजीपार्क स्मशानभूमीत अंतिमसंस्कार करण्यात येतील. स्थापत्य अभियंता असलेले संझगिरी, मुंबई महानगरपालिकेतून मुख्य अभियंता म्हणून सेवानिवृत्त झाले होते. १९८० पासून त्यांनी विविध वृत्तपत्रातून क्रीडाविषयक लेखन केलं.   सलग ११ विश्वचषकांचं वार्तांकन करणारे ते एकमेव पत्रकार मानले जातात. त्यात कपिल दे...