November 9, 2024 6:49 PM November 9, 2024 6:49 PM
10
महाराष्ट्रातल्या मतदारांनी देशभक्ती, राजकीय समज आणि दूरदृष्टी दाखवून भाजपाला सलग १० वर्षं सर्वाधिक पसंती दिली – प्रधानमंत्री
महाराष्ट्रानं २०१४ ते २०२४ अशी दहा वर्षं भाजपाला सातत्यानं संधी दिली, महाराष्ट्रवासीयांची देशभक्ती, राजकीय समज आणि दूरदृष्टी यातून दिसते, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अकोला इथं एका प्रचारसभेत ते बोलत होते. महाराष्ट्राच्या नागरिकांनी दाखवलेल्या या विश्वासामुळे महाराष्ट्राची सेवा करण्यात वेगळंच सुख मिळतं, असंही ते म्हणाले. पालघर जिल्ह्यातलं वाढवण बंदर देशातलं सर्वात मोठं बंदर असून त्यासाठी ८० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. प्रधानम...