July 11, 2024 11:39 AM July 11, 2024 11:39 AM
10
प्रधानमंत्र्यांची व्हिएन्नात ऑस्ट्रियाचे चॅन्सेलर कार्ल नेहमर यांच्याशी चर्चा संपन्न
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रियाचे चॅन्सेलर कार्ल नेहमर यांच्याशी काल व्हिएन्नामध्ये चर्चा केली. गुंतवणूक आणि व्यापार, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, पर्यावरण आणि हवामान बदल, सांस्कृतिक सहकार्य यांच्यासह द्विपक्षीय संबंधांबाबतच्या विविध मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली.उभय देशांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या विविध विषयांवर दोन्ही नेत्यांनी मतं मांडली. बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात प्रधानमंत्री म्हणाले, की हवामान बदल आणि दहशतवादासह...