August 16, 2025 11:43 AM August 16, 2025 11:43 AM
10
जीएसटी दरांमधील सुधारणांच्या संकेताचे व्यापार जगताकडून स्वागत
स्वातंत्र्यदिनाच्या संबोधनामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जीएसटीमध्ये सुधारणा करून, उद्योगजगत आणि सामान्य नागरिकांवरचा बोजा कमी करण्याचे संकेत दिले. जीएसटी सुधारणा ही काळाची गरज असल्याचे सांगून जीएसटी दरांचा आढावा घेण्याची गरज मोदींनी अधोरेखित केली होती. प्रधानमंत्र्यांच्या या घोषणेचे उद्योग जगताकडून स्वागत झाले आहे. कर प्रणालीचे सुलभीकरण आणि व्यापाराला चालना देण्यासाठी हे अत्यंत आवश्यक पाऊल असल्याची प्रतिक्रिया उद्योग जगताकडून आली आहे. सध्या व्यापाऱ्यांना ५ ते २८ टक्के करदराला तोंड द्या...