July 24, 2024 8:20 PM July 24, 2024 8:20 PM

views 18

जगातल्या एकूण दूध उत्पादनात भारताचा २५ टक्के वाटा – मंत्री राजीव रंजन सिंग

जगात सर्वात जास्त दूध उत्पादन भारतात होत असून जगातल्या एकूण दूध उत्पादनात भारताचा वाटा २५ टक्के असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दूग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग यांनी आज राज्यसभेत दिली. नीट यूजी परीक्षा रद्द करण्याचा आणि राज्यनिहाय प्रवेश परीक्षा पद्धत पुन्हा सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुकांता मुजुमदार यांनी आज राज्यसभेत स्पष्ट केलं.