August 14, 2024 8:50 PM August 14, 2024 8:50 PM

views 14

जम्मू आणि काश्मीर मध्ये झालेल्या चकमकीत कॅप्टन दीपक सिंग शहीद

जम्मू आणि काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात आज झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. या चकमकीत भारतीय सैन्य दलातले कॅप्टन दीपक सिंग शहीद झाले. या चकमकीत एक नागरिक जखमी झाला आहे.   काल रात्री डोडा जिल्ह्यातल्या शिवगढ असर भागात लपलेल्या दहशतावाद्यांना सुरक्षा दलांनी घेरलं होतं. रात्री उशिरा सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक झाली. गोळीबारा दरम्यान कॅप्टन सिंग जखमी झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे उपचारा दरम्यान त्यांचं निधन झालं.