December 5, 2024 7:20 PM December 5, 2024 7:20 PM

views 9

६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महापालिका सज्ज

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरातून येणाऱ्या अनुयायांना सुविधा पुरवण्यासाठी मुंबई महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे. पालिकेनं चैत्यभूमी परिसरात नियंत्रण कक्ष उभारला असून रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये अशा सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. चैत्यभूमी परिसरात लावलेल्या एलईडी स्क्रीनवर मुख्य कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय करण्यात आली आहे. चैत्यभूमी जवळच्या समुद्रात जीवरक्षक बोटी,...

July 11, 2024 3:08 PM July 11, 2024 3:08 PM

views 5

बी. आय. टी. चाळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी सरकारची भूमिका सकारात्मक – उदय सामंत

मुंबईच्या परळ भागातल्या बी. आय. टी. चाळीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं दीर्घकाळ वास्तव्य असल्यानं तिथे त्यांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी सरकारची भूमिका सकारात्मक आहे, अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी आज महाराष्ट्र विधानपरिषदेत दिली. या चाळीत अद्याप काही लोक राहत असून त्यांचं पुनर्वसन झाल्यावर स्मारकाचं काम पुढे नेण्यात येईल, असंही त्यांनी नमूद केलं. इंदू मिल परिसरातही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभारण्याचं काम वेगानं सुरू आहे. त्यांचा भव्य पुतळा उभारण्यास लागणारा वेळ सोडता उर्वरित काम...