July 11, 2024 8:52 AM July 11, 2024 8:52 AM

views 17

झिम्बाब्वेविरुद्ध तिसऱ्या वीस षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारताचा विजय

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील वीस षटकांच्या पाच सामन्याच्या मालिकेतील तिसरा सामना काल भारतानं 23 धावांनी जिंकला. आणि मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. कर्णधार शुभमन गिलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं झिम्बाब्वेसमोर 182 धावांचं उद्दिष्ट ठेवलं होतं. प्रत्युत्तरादाखल यजमान संघाचा डाव 159 धावांत संपुष्टात आला. डीऑन माईर्सनं सर्वाधिक 65 धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरनं सर्वाधिक 3 बळी घेतले. मालिकेतील चौथा सामना 13 जुलैला होणार आहे.  

July 6, 2024 8:17 PM July 6, 2024 8:17 PM

views 17

झिम्बाब्वे विरुद्धच्या टी ट्वेंटी सामन्यात भारतीय संघाचा पराभव

झिम्बाव्बे विरुद्धच्या टी - ट्वेंटी मालिकेतल्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. झिम्बाब्वेमधल्या हरारे इथं शेवटच्या षटकापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाला १३ धावांनी पराभव पत्करावा लागला. दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या सामन्यात उतरला होता. नाणेफेक जिंकून भारतीय संघानं झिम्बाब्वेला फलंदाजीला पाचारण केलं. झिम्बाब्वेकडून कुठलाही खेळाडू मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. निर्धारित २० षटकात झिम्बाब्वेनं ९ बाद ११५ धावा केल...