June 14, 2024 7:45 PM June 14, 2024 7:45 PM

views 19

प्रधानमंत्र्यांची इटलीमधे विविध राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा संपन्न

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीमधे अपुलिया इथं आज विविध राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा केली. जी सेव्हन देशांच्या शिखर परिषदेसाठी मोदी सध्या इटलीत आहेत. आज दुपारी त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, अंतराळ, शिक्षण, हवामान बदल, पायाभूत सुविधा, उर्जा, क्रीडा इत्यदी क्षेत्रातल्या परस्पर सहकार्याविषयी त्यांची बातचीत झाली. जागतिक आणि क्षेत्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवरही उभय नेत्यांमधे विचारांची देवाण घेवाण झाली. पुढच्या वर्षी फ्रान्समधे होणाऱ्या क...