August 11, 2024 8:44 PM August 11, 2024 8:44 PM

views 2

श्रीमचैलमाता यात्रेला सुमारे १ लाखाहून अधिक भाविकांची हजेरी

जम्मू काश्मीरमधल्या किश्तवाड जिल्ह्यातल्या  वार्षिक श्रीमचैलमाता  यात्रेला सुमारे १ लाखाहून अधिक भाविकांनी हजेरी लावली आहे.  किश्तवाड प्रशासनानं यात्रेला भेट देणाऱ्या भाविकांसाठी 4-G कनेक्टिव्हिटी, हेलिकॉप्टर सेवा आणि ऑनलाइन नोंदणी आदी  सुविधा उपलब्ध  करून दिल्या होत्या. जम्मू काश्मिरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं आणि जम्मू काश्मिरमध्ये शांतता, समृद्धी आणि विकास होण्याबाबत देवीला साकडं घातलं. तसंच भक्तभवनात भाविकांसाठी नव्या प्रशस्त यज्ञशाळेचं उदघाटन त्यांनी केलं....

July 16, 2024 3:01 PM July 16, 2024 3:01 PM

views 13

जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात सुरक्षा दलाचे ५ जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात काल रात्री दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत गंभीर जखमी झालेल्या पाच सुरक्षादल जवानांचा आज मृत्यू झाला. यात लष्कराच्या एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे. या भागात दहशतवाद्यांचा वावर असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष कार्य दलाच्या पथकांनी शोधमोहीम राबवली.   या दरम्यान दहशतवाद्यांशी चकमक होऊन पाच जवान जखमी झाले होते. त्या पाचही जणांना आज वीरमरण आलं. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. कर्त...

July 11, 2024 3:25 PM July 11, 2024 3:25 PM

views 7

जम्मू काश्मीरमध्ये सात सदस्यीय समिती स्थापन

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या तेरा वर्षांपासून अवैधरित्या राहत असणाऱ्या परकीय नागरिकांना शोधण्यासाठी प्रशासनाने सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या नागरिकांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवणं आणि अवैध स्थलांतर रोखणं हा यामागचा हेतू आहे. गृह विभागाच्या प्रशासकीय सचिवांच्या अध्यक्षतेखालील ही समिती जम्मू काश्मीरमध्ये २०११ पासून अवैधरीत्या राहणाऱ्या नागरिकांना शोधून काढेल. अवैध स्थलांतरितांची वैयक्तिक आणि बायोमॅट्रिक माहिती गोळा करणं, आणि अद्ययावत डिजिटल नोंदी ठेवण्याचं काम ही समिती करणार आहे.

July 11, 2024 12:57 PM July 11, 2024 12:57 PM

views 4

कठुआ हल्ल्यात सहभागी झालेल्या दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू

जम्मू आणि काश्मीरमध्ये, कठुआ हल्ल्यात सहभागी झालेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी 20 हून अधिक जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, तर आज चौथ्या दिवशी मोठ्या प्रमाणावर शोध सुरू आहे. या हल्ल्यात पाच जवानांना वीरमरण आलं होतं. घनदाट जंगलात अधूनमधून मुसळधार पाऊस आणि धुके असतानाही कठुआ, भदरवाह आणि उधमपूर भागात मोठ्या प्रमाणावर शोधकार्य सुरू आहे. हा भूभाग अतिशय अवघड असून प्राणघातक हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा माग काढण्यासाठी कसून शोध सुरु आहे. लष्कराचे एलिट पॅराट्रूपर्ससह शोध पथकांना हे...

June 20, 2024 1:33 PM June 20, 2024 1:33 PM

views 6

प्रधानमंत्री दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते ८४ विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन करणार असून श्रीनगरमध्ये उद्या होणाऱ्या `युवकांचं सक्षमीकरण, जम्मू-काश्मीरमध्ये बदल` या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. सरकारी सेवेत प्रवेश करणाऱ्या दोन हजार उमेदवारांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्त्यांची पत्रं वितरित करण्यात येतील. तसंच उद्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात सुमारे ७ हजार नागरिक सहभागी होण्...