August 15, 2025 2:42 PM August 15, 2025 2:42 PM

views 3

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटीच्या बळींची संख्या ४५

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात काल झालेल्या ढगफुटीमुळे किमान ४५ जणांचा मृत्यू झाला असून यात सीआयएसएफचे दोन कर्मचारी आणि मछैल माता यात्रेसाठी आलेल्या अनेकांचा समावेश आहे. आत्तापर्यंत वाचवण्यात आलेल्या शंभरपेक्षा जास्त जणांपैकी ३८ जणांची प्रकृती गंभीर आहे. असंख्य नागरिक अद्याप बेपत्ता असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, पोलीस, लष्कर आणि स्थानिकांच्या मदतीनं मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी य...

December 7, 2024 1:59 PM December 7, 2024 1:59 PM

views 7

जम्मू-काश्मीरमध्ये हिवाळी सुट्ट्या जाहीर

जम्मू-काश्मीरच्या शालेय शिक्षण विभागानं थंड भागातल्या उच्च माध्यमिक स्तरापर्यंतच्या सर्व सरकारी आणि मान्यताप्राप्त खासगी शाळांना हिवाळी सुट्टी जाहीर केली आहे. या आदेशानुसार पाचवीपर्यंतचे वर्ग १० डिसेंबर ते २८ फेब्रुवारी आणि सहावी ते बारावीचे वर्ग १६ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी दरम्यान बंद राहणार आहेत.  

November 10, 2024 5:03 PM November 10, 2024 5:03 PM

views 13

जम्मू-काश्मीर : सुरक्षा दलाची दहशतवाद्यांसोबत चकमक सुरूच

जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगर नजिकच्या झाबरवान जंगल परिसरात आज सकाळी सुरक्षा दलानं केलेल्या शोधमोहिमेनंतर सुरक्षा दलाच्या जवानांची दहशतवाद्यांसोबत सुरु झालेली चकमक अद्यापही सुरुच असल्याचं वृत्त आहे. संशयित स्थळी सुरक्षा दलाचे जवान पोहोचताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार करायला सुरुवात केली. या चकमकीत अजूनपर्यंत जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.  

October 9, 2024 2:37 PM October 9, 2024 2:37 PM

views 12

जम्मू काश्मीरमध्ये अनंतनाग इथे दहशतवाद्यांनी केलं सैन्याच्या दोन जवानांचं अपहरण

जम्मू काश्मीरमध्ये अनंतनाग इथे दहशतवाद्यांनी काल सैन्याच्या दोन जवानांचं अपहरण केलं. त्यातल्या एका जवानाचा शोध लागला असून दुसऱ्या जवानासाठी सुरक्षा दलांनी शोधमोहीम राबवली आहे.

October 3, 2024 8:03 PM October 3, 2024 8:03 PM

views 14

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत एकूण ६३ पूर्णांक ८८ शतांश टक्के मतदान

जम्मू आणि काश्मीरमध्ये ३ टप्प्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत एकूण ६३ पूर्णांक ८८ शतांश टक्के मतदान झालं असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. येत्या मंगळवारी मतमोजणी होणार आहे.    जम्मू आणि काश्मीरमध्ये या वर्षअखेरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुका शांततेत पार पाडाव्यात यासाठी, विधानसभा निवडणुकीदरम्यान तैनात केलेला बंदोबस्त डिसेंबरपर्यंत कायम ठेवला जाणार आहे.  

October 1, 2024 8:31 PM October 1, 2024 8:31 PM

views 13

जम्मूकाश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या मतदानाला आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६५ पूर्णांक ४८ शतांश टक्के मतदान झालं. तिसऱ्या टप्प्यात ४० विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी २४ जम्मू विभागात तर १६ काश्मीरमध्ये आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या टप्प्यात सर्वाधिक ७२ पूर्णांक ९१ शतांश टक्के मतदान उधमपूरमध्ये झालं आहे.    जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी १८ सप्टेंबरला पहिल्या तर  २५ सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्यात मतदान झालं. पहिल्या टप्प्यात...

September 30, 2024 7:51 PM September 30, 2024 7:51 PM

views 11

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीनंतर सुरक्षा दलांची व्यापक शोधमोहीम

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत नुकत्याच झालेल्या चकमकीनंतर आज सुरक्षा दलांनी व्यापक शोधमोहीम राबवली. कठुआ जिल्ह्यातल्या बिल्लवर तालुक्यातल्या कोग मंडली जंगल परिसरात शनिवारी संध्याकाळी पोलीस आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एका पोलिसाला वीरमरण आलं होतं तसंच एक दहशतवादी  ठार झाला होता. तर रजौरी जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक झाली होती. या पार्श्वभूमीवर आज सलग तिसऱ्या दिवशी शोधमोहीम राबवण्यात आली. 

September 27, 2024 2:37 PM September 27, 2024 2:37 PM

views 8

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातला प्रचार शिगेला

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातला प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. या टप्प्यात ४० मतदारसंघांमधे येत्या १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. आकाशवाणीच्या जम्मू वार्ताहरानं कळवलं आहे की, विविध राजकीय पक्षांनी प्रचारसभा, आणि रोड शोचा धडाका लावला आहे. मतदारांशी वैयक्तिक भेटून प्रचारावरही भर दिला जात आहे. भाजपाचे प्रमुख प्रचारक, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा उद्या जम्मूच्या मौलाना आझाद स्टेडियममधे होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या...

August 27, 2024 8:23 PM August 27, 2024 8:23 PM

views 4

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची तिसरी यादी जाहीर

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीनं तिसरी उमेदवार यादी आज जाहीर केली. यादीत २९ उमेदवारांचा समावेश असून त्यात देविंदरसिंग राणा, पवन गुप्ता, अब्दुल गनी चौधरी आणि बलदेव राज शर्मा यांना संधी मिळाली आहे.

August 14, 2024 8:50 PM August 14, 2024 8:50 PM

views 15

जम्मू आणि काश्मीर मध्ये झालेल्या चकमकीत कॅप्टन दीपक सिंग शहीद

जम्मू आणि काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात आज झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. या चकमकीत भारतीय सैन्य दलातले कॅप्टन दीपक सिंग शहीद झाले. या चकमकीत एक नागरिक जखमी झाला आहे.   काल रात्री डोडा जिल्ह्यातल्या शिवगढ असर भागात लपलेल्या दहशतावाद्यांना सुरक्षा दलांनी घेरलं होतं. रात्री उशिरा सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक झाली. गोळीबारा दरम्यान कॅप्टन सिंग जखमी झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे उपचारा दरम्यान त्यांचं निधन झालं.