July 13, 2024 12:13 PM July 13, 2024 12:13 PM

views 9

छत्रपती संभाजीनगर इथले हेरिटेज वॉक चळवळीचे प्रणेते इतिहास अभ्यासक रफत कुरेशी यांचं निधन

छत्रपती संभाजीनगर इथल्या हेरिटेज वॉक चळवळीचे प्रणेते, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक रफत कुरेशी यांचं काल कॅनडात निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. तजकरे उजालों के, मुल्के खुदा तंगनिस्त, ही त्यांची उर्दू पुस्तकं प्रकाशित आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या निवृत्त पर्यटन विभागप्रमुख डॉ. दुलारी कुरेशी यांचे ते पती होत. डॉ. दुलारी यांच्यासह त्यांनी औरंगाबादनामा या मराठी आणि द ग्लोरियस औरंगाबाद या इंग्रजी पुस्तकांचं सहलेखन केलं. ऐतिहासिक वास्तुंचा संरक्षित वास्तूंच्या यादीत समावेश करवून घेण्या...

July 11, 2024 11:25 AM July 11, 2024 11:25 AM

views 2

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या बायोमायनिंग प्रकल्पासाठी महिनाभरात कार्यादेश-उद्योगमंत्री उदय सामंत

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमार्फत शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून त्याचे कार्यादेश येत्या महिन्याभरात देण्यात येतील, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. यासंबंधी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महानगरपालिकेकडून निविदा प्रक्रियेमध्ये अटींचा समावेश करण्यात आला आहे. यानूसार पात्र ठरलेल्या निविद...

June 17, 2024 9:45 AM June 17, 2024 9:45 AM

views 10

पाणी प्रश्नी मराठवाड्यातल्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याचं मंथन परिषदेतून आवाहन

छत्रपती संभाजीनगर इथं काल मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान, टीम ऑफ असोसिएशन, मासिआ, शेतकरी सहकारी पाणी वापर संस्था आणि साखर कारखान्यार्फे मराठवाड्यातल्या पाणी प्रश्नावर मंथन परिषद पार पडली. खासदार संदीपान भुमरे, खासदार भागवत कराड, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, जालन्याचे खासदार कल्याण काळे, आमदार राजेश टोपे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळण्यासाठी आणि विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी मराठवाड्यातल्या सर्व आमदार खासदारांनी पक्षीय मतभेद बाजुला ठेऊन एकत्र यावं, मराठवाड्याच्य...