June 18, 2025 11:04 AM June 18, 2025 11:04 AM

views 8

छत्रपती संभाजीनगर – बीबी का मकबऱ्याच्या प्रांगणात होणार आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम

आंतरराष्ट्रीय योग दिन येत्या शनिवारी साजरा होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या दिनाचा मुख्य कार्यक्रम ऐतिहासिक बीबी का मकबऱ्याच्या प्रांगणात होणार आहे. सकाळी साडे सहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात योग प्रात्यक्षिकांचं सादरीकरण आणि सामूहिक योगासनं होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेशही थेट प्रसारित केला जाणार आहे. या कार्यक्रमात अधिकाधिक योग संस्थांनी आणि व्यायाम प्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे.

June 13, 2025 11:48 AM June 13, 2025 11:48 AM

views 5

सिद्धार्थ उद्यानात कमान कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात कमान कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलां आहे. परवा सायंकाळी वादळी वाऱ्यात या उद्यानाची कमान कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला होता.

April 17, 2025 3:38 PM April 17, 2025 3:38 PM

views 4

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा उद्या छत्रपती संभाजीनगरचा दौरा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी साडेचार वाजता विशेष विमानाने ते शहरात पोहोचतील, सिडको परिसरातल्या कॅनॉट इथल्या उद्यानात उभारण्यात आलेल्या महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं अनावरण सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमानंतर ते उद्योजकांशी संवाद साधतील. त्यानंतर ते विशेष विमानाने लखनऊ कडे रवाना होणार आहेत.  

April 15, 2025 11:09 AM April 15, 2025 11:09 AM

views 11

‘संवाद मराठवाड्याशी’ या उपक्रमाअंतर्गत छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त आज नागरीकांशी वेबिनारद्वारे साधणार संवाद

‘संवाद मराठवाड्याशी’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे आज नागरीकांशी वेबिनारद्वारे संवाद साधणार आहेत. नगरपालिका क्षेत्रात वार्ड भेट समस्या समाधान अभियानाच्या माध्यमातून ते नागरिकांशी बोलणार असून, आठही जिल्ह्यातल्या नागरिकांनी यात सहभागी होण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.  

April 9, 2025 9:58 AM April 9, 2025 9:58 AM

views 14

परभणी इथं शालेय शिक्षण विभागाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाचा शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी घेतला आढावा

शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी काल परभणी इथं शालेय शिक्षण विभागाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाचा आढावा घेतला. या बैठकीत आदर्श शाळा, निपुण महाराष्ट्र अभियानामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत झालेली वृद्धी, सीएम श्री शाळाबाबत माहिती, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, विद्यार्थी लाभाच्या विविध योजना आदींचा आढावा घेण्यात आला.

April 5, 2025 11:21 AM April 5, 2025 11:21 AM

views 11

छत्रपती संभाजीनगर – चारचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल चारचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. वैजापूर तालुक्याच्या नांदगाव शिवारात हा अपघात झाला, वाहनचालकाचं नियंत्रण सुटलेली चारचाकी खड्ड्यात आदळून हवेत उडाली, आणि उच्च दाब विद्युत तारांवर आदळून खाली पडल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

February 11, 2025 9:30 AM February 11, 2025 9:30 AM

views 20

छत्रपती संभाजीनगर – जीवन प्राधिकरण अंतर्गत एक हजार १६४ योजनांची कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

जलजीवन मिशन अंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथं जीवन प्राधिकरण अंतर्गत एकूण एक हजार १६४ योजनांची कामं जलदगतीने पूर्ण करण्यासंदर्भातील कार्यवाहीचा, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल आढावा घेतला. नळ पाणी पुरवठा अंतर्गत १०० टक्के नळ जोडणी पूर्ण झालेल्या ७१७ योजना असून, उर्वरित ४४० कामं पूर्ण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पाटील यांनी दिले.

February 3, 2025 11:05 AM February 3, 2025 11:05 AM

views 11

छत्रपती संभाजीनगर इथल्या ‘मुक्तिसोपान न्यास संस्थेला वि.वा.देसाई स्मृती पुरस्कार जाहीर

छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे दिला जाणारा वि. वा. देसाई स्मृती पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथल्या 'मुक्तिसोपान न्यास संस्थेला जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह आणि पंधरा हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आज सोमवारी हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.

January 22, 2025 9:58 AM January 22, 2025 9:58 AM

views 3

छत्रपती संभाजीनगर इथले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

छत्रपती संभाजीनगर इथले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांनी अनेक पदाधिकारी तसंच शिवसैनिकांसोबत काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.  

January 15, 2025 10:58 AM January 15, 2025 10:58 AM

views 13

छत्रपती संभाजीनगर इथल्या पाणचक्की तसेच दरवाजांचं चित्र असलेल्या टपाल तिकीटांचं भागवत कराड यांच्या हस्ते प्रकाशन

छत्रपती संभाजीनगर इथल्या ऐतिहासिक पाणचक्की आणि दरवाजांचे चित्र असलेल्या टपाल तिकीटांचं काल खासदार भागवत कराड यांच्या हस्ते प्रकाशन झालं. छत्रपती संभाजीनगर इथल्या एमजीएम विद्यापीठात झालेल्या या कार्यक्रमात, पारपत्राची सुविधा शहरातल्या टपाल कार्यालयाद्वारे देण्यात यावी अशी अपेक्षाही कराड यांनी व्यक्त केली. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. देशभरातल्या टपाल कार्यालयात सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर इथल्या कार्यालयाला ई - सायकल प्राप्त झाल्या आहेत, विभागाचे दो...