February 7, 2025 1:36 PM February 7, 2025 1:36 PM

views 20

चीनमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या ५९ खेळाडूंचा सहभाग

चीनमध्ये आजपासून येत्या १४ फेब्रुवारी पर्यंत नवव्या आशियाई हिवाळी क्रीडास्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेतल्या भारतीय तुकडीत ८८ जणांचा समावेश आहे. यात ५९ खेळाडू आणि २९ संघ अधिकारी आहेत. यंदा प्रथमच, अल्पाइन स्कीइंग, क्रॉस-कंट्री स्कीइंग, फिगर स्केटिंग, शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग आणि लाँग ट्रॅक स्पीड स्केटिंग या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा महासंघ संपूर्ण अर्थसहाय्य देणार आहे.

July 6, 2024 6:05 PM July 6, 2024 6:05 PM

views 15

चीनच्या हेझ शहरात झालेल्या वादळामुळे पाच जणांचा मृत्यु तर ८८ जण जखमी

चीनच्या शॅडोन्ग परगण्यातल्या हेझ शहरात झालेल्या जोरदार वादळामुळे पाचजण मृत्युमुखी पडले तर ८८ जण जखमी झाले. डोन्गमिन्ग आणि ज्युआनचेंग या भागांना वादळाचा तडाखा बसल्याचं स्थानिक प्रशासनानं सांगितलं. यात २ हजार ८२० घरांची पडझड झाली तर ४ हजार ६० हेक्टर पिकं आणि ४८ वीजपुरवठा केंद्राचं नुकसान झालं. नुकसानीच्या सर्वेक्षणासाठी कृती दलाची स्थापना केल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. रस्ते वाहतूक आणि संपर्कव्यवस्था प्रामुख्याने पूर्वपदावर आणल्याचं त्यांनी कळवलं आहे. 

June 16, 2024 12:53 PM June 16, 2024 12:53 PM

views 35

जी सेव्हन देशांचा चीनच्या कथित अनुचित व्यापारप्रथांवर तोडगा काढण्याचा निश्चय

चीनच्या कथित अनुचित व्यापारप्रथांवर तोडगा काढण्याचा निश्चय जी सेव्हन देशांनी केला आहे. जी सेव्हन देशांच्या शिखरपरिषदेच्या आजच्या शेवटच्या दिवशी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात हा मुद्दा प्राधान्याने मांडण्यात आला आहे. युक्रेनविरुद्धच्या लष्करी कारवायांसाठी रशियाला शस्त्रास्त्र खरेदीसाठी मदत पुरवणाऱ्या चिनी वित्तीय संस्थांविरुद्ध पावलं उचलण्याचा इशाराही या देशांनी दिला आहे. याचा हेतू चीनच्या आर्थिक प्रगतीला खीळ घालण्याचा नसून व्यापार उदिमातल्या उचित प्रथांचं संरक्षण करण्याचा आहे, असं या निवेदन...