June 14, 2024 7:51 PM June 14, 2024 7:51 PM

views 11

राज्यातल्या सुमारे साडे बाराशे महसुली मंडळात चारा डेपो उभारायला राज्य सरकारची परवानगी

राज्यातल्या अनेक भागात पावसाचं आगमन झालं असलं तरी अनेक विभागात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही म्हणून १ हजार २४५ महसुली मंडळात चारा डेपो उभारायला शासनानं परवानगी दिली आहे. राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री, राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून जनावरांचं पालन करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या राज्यात सुमारे ५१२ लाख मेट्रिक टन हिरवा चारा तर सुमारे १४४ लाख मेट्रिक ...