October 20, 2024 3:27 PM October 20, 2024 3:27 PM
9
मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळावर प्रवाशाकडून 8 कोटी रुपये किंमतीचा गांजा जप्त
मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल बँकॉकहुन आलेल्या एक प्रवाशाकडून सुमारे ८ किलोहून अधिक गांजा जप्त करण्यात आला असून या गांजाची किंमत अंदाजे ८ कोटी रुपये इतकी आहे. या प्रवाश्याने हा गांजा खेळणी आणि अन्नपदार्थांच्या डब्ब्यात लपवला होता. या व्यक्तीला अमली पदार्थ नियंत्रण कायद्याखाली अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.