December 12, 2024 10:24 AM December 12, 2024 10:24 AM
9
अफगाणिस्तानचे निर्वासितांसाठीचे मंत्री खलिल रेहमान हक्कानी यांचा काबूलमध्ये आत्मघातकी हल्ल्यात मृत्यू
अफगाणिस्तानचे निर्वासितांसाठीचे मंत्री खालिल रेहमान हक्कानी यांचा काल आत्मघातकी हल्ल्यात मृत्यू झाला. काबूलमधील त्यांच्या कार्यालयात हा स्फोट झाला. हक्कानी कागदपत्रांवर सही करत असताना आत्मघातकी हल्लेखोरानं प्रवेश केला आणि त्यानं बॉब उडवून दिला. या हल्ल्यात आणखी सहा जणांचाही मृत्यू झाला. हा हल्ला आयसिसच्या अतिरेक्यांनी घडवून आणल्याचा आरोप अफगाणिस्ताननं केला आहे. मात्र, अजून कोणत्याही संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं सत्तेवर ताबा मिळवल्यानंतरचा हा सर्वांत...