November 6, 2024 10:26 AM November 6, 2024 10:26 AM

views 7

जालना जिल्ह्यात २०२३-२४ या वर्षाच्या खरीप हंगामाची पैसेवारी जाहीर

जालना जिल्ह्यात २०२३-२४ या वर्षाच्या खरीप हंगामाची पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातल्या ९७१ गावांपैकी ४६२ गावांमध्ये ५० पैशापेक्षा कमी, ५०९ गावांमध्ये ५० पैशांपेक्षा जास्त पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. परतूर तालुक्यातलं राणीवाहेगाव हे गाव पूर्णत: निम्न दुधना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामध्ये गेल्यामुळे त्या गावाची पैसेवारी जाहीर करण्यात आलेली नाही, असे जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.