September 28, 2024 7:13 PM September 28, 2024 7:13 PM
14
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोल्हापूरातून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला सुरुवात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज कोल्हापुरातून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत या योजनेतल्या पहिल्या कोल्हापूर ते अयोध्या या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला. या पहिल्या रेल्वेगाडीतून ८०० ज्येष्ठ नागरिक रवाना झाले असून आपली वडीलधारी मंडळी ही आपली जबाबदारी असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.