November 14, 2024 1:17 PM November 14, 2024 1:17 PM
12
१० राज्यांतल्या ३१ विधानसभा मतदारसंघ आणि केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक
१० राज्यांतल्या ३१ विधानसभा मतदारसंघ आणि केरळातल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही काल मतदान झालं. यामध्ये राजस्थानातले सात, पश्चिम बंगालमधले सहा, आसाममधले पाच, बिहारमधले चार, कर्नाटकातले तीन आणि मध्य प्रदेशातल्या दोन जागांचा समावेश आहे. याशिवाय केरळ, छत्तीसगड, गुजरात आणि मेघालयमध्ये विधानसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठी काल मतदान झालं. केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सुमारे ६५ टक्के मतदान झालं.