November 10, 2024 3:19 PM November 10, 2024 3:19 PM
72
मतदार जनजागृतीसाठी सर्वत्र विविध उपक्रम, कार्यक्रमांचं आयोजन
विधानसभा निवडणुकीत मतदारांना मतदानाचं कर्तव्य करावं याकरता मतदान जनजागृतीचे कार्यक्रम महाराष्ट्रात सर्वत्र होत आहेत. निवडणूक आयोग आणि केंद्रीय संचार ब्यूरो तर्फे जनजागृती करणारी वाहनं राज्यातल्या १५ जिल्ह्यांमधे पाठवणयात आली आहेत. ठिकठिकाणी प्रशासकीय यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्था संघटनांमार्फत मॅरेथॉन, प्रदर्शन, कार्यशाळा असे कार्यक्रम होत आहेत.