September 28, 2024 7:07 PM September 28, 2024 7:07 PM
14
मतदारांना निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिकसहभागी होण्याचं निवडणूक आयोगाचं आवाहन
राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनाही सहभागी व्हावं आणि मतदानाची टक्केवारी वाढवावी असं आवाहन केंद्रीय निवडणूक आयोगानं आज मुंबईत केलं. त्यासाठी विविध शहरांमध्ये विशेष मोहिम राबवली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर मुंबईत वार्ताहर परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली. मतदान केंद्रावर मतदारांना अधिकाधिक सुविधा देण्यात याव्या असे आदेश दिले आहेत. त्यासाठी एका मतदान केंद्रावर सरासरी ९५० मतदार असतील याची काळजी घेतल्याचं त्यांनी सांगि...