February 11, 2025 10:33 AM February 11, 2025 10:33 AM

views 8

देशात गेल्या वर्षात पंचवीस हजार कोटींहून अधिक मूल्याचे अमली पदार्थ जप्त

अमली पदार्थांविरोधात शून्य सहनशीलता धोरणाचा भाग म्हणून करण्यात आलेल्या कारवाईत 2024 मध्ये पंचवीस हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याचे अमली पदार्थ जप्त केले आहेत, 2023 मध्ये जप्त केलेल्या अमली पदार्थांच्या तुलनेत ते 55 टक्के अधिक असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे.  

February 7, 2025 11:06 AM February 7, 2025 11:06 AM

views 13

गोदावरी नदीत अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

पैठण इथल्या नाथसागर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जुने कावसान इथल्या गोदावरी नदीत अवैध वाळू उत्खनन करणार्यांवर पोलिसांनी कारवाई केली. अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या पथकाने मध्यरात्रीच्या दरम्यान याठिकाणी छापा मारुन हायवा, यारी मशीन, लोडर जप्त केलं.

December 4, 2024 7:39 PM December 4, 2024 7:39 PM

views 17

डीआरआयच्या कारवाईत मेफेड्रोन आणि १ कोटी ९३ लाख रुपयांची रोकड जप्त

डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयानं तस्करीच्या एका प्रकरणात सोळा किलो मेफेड्रोन हा सायकॅट्रॉपीक पदार्थ आणि सुमारे एक कोटी ९३ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. १९८५ सालच्या NDPS या कायद्याच्या तरतुदीनुसार या प्रकरणी एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हैद्राबादहुन मुंबईला जाणाऱ्या एका बस मधून जाणारे दोन प्रवासी मेफेड्रोन या अंमली पदार्थाची तस्करी करत असल्याची गुप्त माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या आधारावरून पाळत ठेवून काल पहाटे या दोन प्रवाशांना अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यानंतर मुंबईतून ...

November 12, 2024 2:18 PM November 12, 2024 2:18 PM

views 19

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध अंमलबजावणी संस्थांच्या कारवाईत आतापर्यंत ४९३ कोटी ४६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध अंमलबजावणी संस्थांच्या कारवाईत १५ ऑक्टोबरपासून आतापर्यंत ४९३ कोटी ४६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. तर सी व्हिजिल ऍपवर आतापर्यंत आचारसंहिता भंगाच्या ४ हजार ७११ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ४ हजार ६८३ तक्रारी निवडणूक आयोगाने निकाली काढल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. मुंबईत नेरूळमध्ये एका घरातून २ कोटी ६० लाखां रुपयांची रोख रक्कम नवी मुंबई पोलिसांनी जप्त केली. कोल्हापूर विधान...