June 17, 2024 6:22 PM June 17, 2024 6:22 PM
20
पश्चिम बंगालमधल्या सिलिगुडीमध्ये रेल्वे अपघातात ९ जणांचा मृत्यू
पश्चिम बंगालच्या न्यु जलपायगुडी स्थानकाजवळ सियालदाहला जाणाऱ्या कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीनं पाठीमागून धडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला असून ३२ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ३ रेल्वे कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अपघातग्रस्त ठिकाणीचे बचाव कार्य पूर्ण झालं आहे. प्रथमदर्शनी मालगाडी चालकानं सिग्नलकडे दुर्लक्ष केल्यानं हा अपघात झाल्याचं निदर्शनास आलं असून अधिक तपासनंतरच अपघाताचं नेमकं कारण समोर येईल, असं रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष जया वर्मा-सिन्हा यांनी सांगितलं. &nbs...