November 6, 2024 3:31 PM November 6, 2024 3:31 PM
15
विधानसभा निवडणुकीसाठीचा राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध
राष्ट्रवादी काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात आज प्रसिद्ध झाला. जवळपास ५० मतदारसंघनिहाय जाहीरनाम्यांसह सर्वंकष जाहीरनामाही प्रकाशित करण्यात आला. अजित पवार यांनी बारामतीतून या मतदारसंघासाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला, तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईतून सर्वसमावेशक घोषणापत्राच्या सारांश पुस्तिकेचं प्रकाशन केलं.