October 26, 2024 5:59 PM October 26, 2024 5:59 PM
17
उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये काही जागांची अदलाबदल करण्यासंदर्भात चर्चा
उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये काही जागांची अदलाबदल करण्यासंदर्भात आज चर्चा झाली. काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाचे बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली. १८० पेक्षा अधिक जागा लढण्याचं महाविकास आघाडीचं लक्ष्य असल्याचं ते यावेळी म्हणाले. जागावाटपाच्या चर्चा शेवटच्या क्षणापर्यंत चालू असतात, महाविकास आघाडीचे घटक पक्ष मैत्रिपूर्ण लढती करणार नाहीत, असंही थोरात यांनी स्पष्ट केलं.