July 1, 2024 5:57 PM July 1, 2024 5:57 PM

views 18

दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त राज्यात कृषी दिन साजरा

माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त आज राज्यात कृषी दिन साजरा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. जिल्हा मुख्यालयांमधे तसंच कृषि उत्पन्न बाजार समित्यांमधेही दिवंगत नाईक यांना आदरांजली वाहण्यात आली.

June 27, 2024 6:39 PM June 27, 2024 6:39 PM

views 17

राज्य विधिमंडळाचं हे अधिवेशन आमच्यासाठी निर्धार आणि निश्चयाचं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्य विधिमंडळाचं हे अधिवेशन आमच्यासाठी निर्धार आणि निश्चयाचं आहे. गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामाच्या जोरावर पुन्हा महायुतीचं सरकार आणण्यासाठी आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केलं आहे. मुंबईत ते वार्ताहरांशी बोलत होते. निरोप कोण कुणाला देतो, हे येणारा काळच ठरवेल, असंही ते म्हणाले. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान आमच्या सरकारनं दिलं. शेताच्या बांधावर जाणारं हे सरकार आहे. शेतकऱ्यांची दुःखं आम्हाला समजतात, असंही शिंदे यांनी नमूद केलं. ड्रग्ज प्रकरण...

June 26, 2024 8:17 PM June 26, 2024 8:17 PM

views 12

राज्याचा आगामी अर्थसंकल्प शेतकरी, महिला, युवक यांच्यासह सर्व जनतेच्या भल्याचा असेल असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास

राज्याचा आगामी अर्थसंकल्प शेतकरी, महिला, युवक यांच्यासह सर्व जनतेच्या भल्याचा असेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते.  राज्यातल्या सर्व मुद्द्यावर सरकार विरोधकांशी चर्चा करायला तयार आहे. पण विरोधकांना केवळ जनतेची दिशाभूल करायची आहे, त्यामुळे ते चर्चेला तयार नसल्याचं ते म्हणाले. विरोधकांनी राज्याच्या हिताचे अनेक प्रकल्प थांबवले. आमच्या सरकारने अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली, ते पूर्णत्वाकडे नेले, असं उपमुख्यमंत्...

June 26, 2024 6:26 PM June 26, 2024 6:26 PM

views 14

‘दरड प्रवण क्षेत्र मुक्त’ मुंबई करण्याचा राज्य सरकारचा संकल्प – मुख्यमंत्री

'दरड प्रवण क्षेत्र मुक्त' मुंबई करण्याचा राज्य सरकारचा संकल्प असून त्याची सुरुवात झाली आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. त्यांनी मुंबईत असल्फा इथल्या हनुमान टेकडी परिसरात भेट देऊन तिथं सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. दरड प्रवण क्षेत्राला सुरक्षा जाळ्या बसवून पावसाळ्यात दरडी कोसळून होणारं नुकसान टाळलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.  धोकादायक ठिकाणच्या नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. धोकादायक इमारती, एसआरए, झोपडपट्टी पुनर्वसनाची ज...

June 22, 2024 7:46 PM June 22, 2024 7:46 PM

views 6

शिक्षकांना शिक्षणबाह्य कामं न देण्याबाबत सरकार विचार करत असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

शिक्षकांना शिक्षणबाह्य कामं न देण्याबाबत सरकार विचार करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अहमदनगर इथं मुख्याध्यापक, शिक्षक मेळाव्यात बोलताना सांगितलं. शिक्षकांनी फक्त शिकवण्याचं काम केलं पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच २००५ पूर्वी सेवेत आलेल्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

June 21, 2024 7:19 PM June 21, 2024 7:19 PM

views 12

जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकल्पाचं काम पुढे नेणार नसल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकल्पाचं काम पुढे नेणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज समाजमाध्यमावर दिली. नागपूर-गोवा जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात सध्या आंदोलन सुरु आहे. त्यासंदर्भात ते बोलत होते.  हे सरकार सर्वसामान्य जनतेचं आहे, त्यामुळे जनतेच्या भावनेचा विचार करुनच तसंच त्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे नेला जाईल, असं ते म्हणाले. समृध्दी महामार्ग हा प्रकल्प आम्ही जनतेला विश्वासात घेऊनच पूर्ण केला, शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाचीही फेरआखणी करता येईल का, याच...

June 21, 2024 8:31 PM June 21, 2024 8:31 PM

views 11

ओबीसींच्या शिष्टमंडळाची सरकारसोबत बैठक

जालना जिल्ह्यात ओबीसी समाजाच्या वतीनं लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यानी सुरु केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत ओबीसींच्या शिष्टमंडळाची सरकारसोबत बैठक सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार यांच्याशी ओबीसी नेते आणि शिष्टमंडळातले सदस्य चर्चा करत आहेत. या बैठकीत मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ, मंत्री अतुल सावे, गिरीश महाजन, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, उदय सामंत, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, म...

June 17, 2024 1:43 PM June 17, 2024 1:43 PM

views 12

राज्यात काही सामाजिक संस्थांमध्ये शहरी नक्षलवादाची घुसखोरी-मुख्यमंत्र्यांचा आरोप

राज्यात काही सामाजिक संस्थांमध्ये शहरी नक्षलवादानं घुसखोरी केल्याचा आरोप मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी केला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या प्रचारासाठी विजय संकल्प मेळावा काल झाला, त्यात मुख्यमंत्री बोलत होते. याच संस्थांच्या सहाय्याने महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबाबत खोटं नरेटिव्ह निर्माण केल्याचा आरोप शिंदे यांनी केला. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विकासाचं खरं नरेटिव्ह निर्माण करण्याचं आवाहन शिंदे यांनी केलं.