February 4, 2025 2:50 PM February 4, 2025 2:50 PM

views 37

दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान निवडणूक आयोगाची जाणूनबूजून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा निवडणूक आयोगाचा आरोप

दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान निवडणूक आयोगाची जाणूनबूजून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यावर वारंवार केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर हे विधान महत्वाचं ठरत आहे. निवडणूक आयोग या आरोपांची दखल न घेता आपलं काम कायद्याच्या चौकटीत राहून अतिशय निःपक्षपातीपणे करतच राहील असं आयोगाने समाजमाध्यमांवर म्हटलं आहे.

October 10, 2024 3:26 PM October 10, 2024 3:26 PM

views 14

पश्चिम बंगालमधल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या संदर्भात राज्य सरकार गंभीर नाही, ज्यूनियर डॉक्टरांच्या संघटनेचा आरोप

पश्चिम बंगालमधल्या कोलकता डॉक्टर हत्या प्रकरणाचा तपास आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या संदर्भात राज्य सरकार गंभीर नाही, कोणतंही लेखी आश्वासन द्यायला सरकार तयार नाही, असा आरोप ज्यूनियर डॉक्टरांच्या संघटनेने केला आहे. राज्य सरकार आणि ज्यूनियर डॉक्टर यांच्यात काल बैठक झाली, मात्र यात कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आंदोलन सुरू राहील असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.