October 18, 2024 7:54 PM October 18, 2024 7:54 PM

views 2

आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर

आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी कॅबिनेट मंत्री सत्येंद्र जैन यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टानं आज मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. जैन यांचा संबंध असलेल्या चार कंपन्यांद्वारे मनी लाँड्रिंग केल्याच्या आरोपाखाली त्यांनी ईडीनं ३० मे २०२२ रोजी अटक केली होती.