August 11, 2024 8:07 PM August 11, 2024 8:07 PM

views 6

कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या अत्याधुनिक शीत गृहांकरता  ११ कोटी रूपये मंजूर

अहमदनगर जिल्ह्यातल्या  राहाता आणि  शिर्डी या परिसरातला  शेतमाल सुरक्षित रहावा यासाठी राहाता इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या  अत्याधुनिक शीत गृहांकरता  ११ कोटी रूपये मंजूर केले असल्याची माहिती  पणन आणि अल्पसंख्याक विकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.   सत्तार यांच्या हस्ते आज  राहाता बाजार समितीच्या परिसरात विविध विकासकामांचं  भूमिपूजन झालं त्यावेळी ते बोलत होते. आगामी काळात बाजार समिती परिसरात  शेतकरी भवन  बांधण्यासाठी दीड कोटी रूपये मंजूर केले जातील, असं आश्वासन त्यांनी दिलं. 

July 14, 2024 3:36 PM July 14, 2024 3:36 PM

views 2

अहमदनगर : श्रीरामपूर जिल्ह्याची निर्मिती करावी या मागणीसाठी आंदोलन

राज्यात भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा आणि प्रशासकीय दृष्ट्या गैरसोयीचा असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करुन गुणवत्तेच्या आधारे श्रीरामपूर जिल्ह्याची निर्मिती करावी या मागणीसाठी आज श्रीरामपूरमधे आंदोलन करण्यात आलं. अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रस्ताव गेल्या चाळीस वर्षांपासून प्रलंबित आहे. श्रीरामपूर जिल्हा निर्मितीची शिफारस जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारकडे १९९८ मध्ये केली आहे.

June 24, 2024 11:20 AM June 24, 2024 11:20 AM

views 2

‘मधुमित्र’ पुरस्कारासाठी अंबड गावातील राजू कानवडे यांची निवड

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्यावतीनं देण्यात येणाऱ्या यंदाच्या 'मधुमित्र' पुरस्कारासाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या अंबड गावातील शेतकरी राजू कानवडे यांची निवड झाली आहे. मधमाशापालन हा व्यवसाय निसर्ग संवर्धनासाठी आणि शेती उत्पादन वाढीसाठी उपयुक्त असून मधमाशांची भुमिका महत्वाची असल्यानं या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळावं हा या पुरस्कारामागील प्रमुख उद्देश आहे. उद्या 25 जूनला पुण्यात या पुरस्कारांचा वितरण सोहोळा होणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंत...

June 18, 2024 7:51 PM June 18, 2024 7:51 PM

views 2

सुनिल तटकरे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याला आजपासून अहमदनगरमधून सुरुवात

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याला आजपासून अहमदनगरमधून सुरुवात झाली. लोकसभेचं अधिवेशन संपल्यानंतर या दौऱ्याची व्यापकता वाढवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शक्तीशाली  करायचा आहे. यापुढं सर्वांनी जबाबदारीचं भान ठेऊन काम करावं, असं आवाहन त्यांनी अहमदनगरमधल्या आढावा बैठकीत केलं. विरोधकांनी पसरवलेले गैरसमज कसे चुकीचे आहेत ते लोकांना सांगायची गरज आहे असं ते म्हणाले.  लोकसभेत आलेले अपयश विसरुन, झालेल्या चूका दुरुस्त करुन विधानसभा निवडणुकीत यश पायरी नक्की मिळवू, अ...

June 14, 2024 6:10 PM June 14, 2024 6:10 PM

views 3

पंढरपूरची वारी करणाऱ्या मुस्लीम धर्मीय बनाभाई सय्यद यांचं निधन

अहमदनगर जिल्ह्यातलं आदर्श गाव म्हणून प्रख्यात असलेल्या हिवरे बाजार इथल्या बनाभाई चांदभाई सय्यद यांचं आज वृध्दापकाळानं निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. मुस्लीम धर्मीय असूनही ते पंढरपूर,आळंदी,देहू इत्यादी तीर्थक्षेत्राची नियमित वारी करत असत. त्यामुळं त्यांना राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणून संबोधलं जात होतं. सय्यद यांचे नातूही भजनात सक्रिय सहभाग घेत असतात. हिवरे बाजार ग्रामस्थांनी या कुटुंबियांसाठी लोकवर्गणीतून मशीद उभारली आहे. त्यामुळं मुस्लीम कुटुंबासाठी मशीद बांधणारं गाव म्हणून हिवरे बाजारचा ल...