April 5, 2025 11:21 AM April 5, 2025 11:21 AM
12
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन फलदायी ठरल्याचं रिजीजू यांचं प्रतिपादन
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन फलदायी ठरल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी म्हटलं आहे. अधिवेशनानंतर वार्ताहरांशी बोलताना रिजीजू यांनी वक्फ विधेयकावर सर्वात दीर्घ चर्चा झाली तसंच त्यात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आला नाही असं नमूद केलं.