October 3, 2024 7:54 PM October 3, 2024 7:54 PM

views 10

प्रधानमंत्री आंतरवासिता योजनेचा प्रायोगिक तत्वावर प्रारंभ

प्रधानमंत्री आंतरवासिता योजनेला आज प्रायोगिक तत्वावर प्रारंभ करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली होती. येत्या ५ वर्षात देशातल्या एक कोटी युवकांना ५००अग्रेसर कंपन्यांमधे आंतरवासिता प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे.   महाराष्ट्र, गुजरात, उत्तराखंड आणि तेलंगणा या राज्यांमधल्या सात जिल्ह्यांमधे हा पथदर्शी प्रकल्प राबवण्यासाठी सरकारनं ८०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी य...