June 18, 2025 10:06 AM June 18, 2025 10:06 AM

views 11

इराणला बिनशर्त शरणागती पत्करण्याचा अमेरिकेचा इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्य़क्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला बिनशर्त शरणागती पत्करण्याचा इशारा दिला आहे. समाज माध्यमांवरील संदेशातून ट्रम्प यांनी, इराणचे सर्वोच्च नेते अली खमेनी यांना पदच्युत करण्याची कारवाई न करता अमेरिका त्यांना जीवे मारू शकते मात्र सद्यस्थितीत अमेरिका अशा प्रकारची कारवाई टाळत असल्याचे म्हटले आहे. नागरिकांवर किंवा अमेरिकन सैनिकांवर क्षेपणास्त्रे डागायची नाहीत यासाठीच अमेरिका कोणतेही पाऊल उचलत नसल्याचे म्हटलं आहे. इराणला बिनशर्त आत्मसर्मपण करण्याचे आवाहन करून त्यांनी खमेनी कुठे लपले आह...

April 15, 2025 3:42 PM April 15, 2025 3:42 PM

views 9

अमेरिका आणि इराण दरम्यान तेहरान अणू प्रकल्पाबाबतच्या चर्चेची दुसरी फेरी शनिवारी रोममध्ये होण्याची शक्यता

अमेरिका आणि इराण यांच्यातील तेहरान अणू प्रकल्पाबाबतच्या चर्चेची दुसरी फेरी शनिवारी रोममध्ये होण्याची शक्यता आहे. इटलीचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अंटोनिओ ताजानी यानी ही बैठक रोममध्ये आयोजित करण्यास रोम तयार असल्याचं काल जाहीर केलं. ताजानी सध्या जपानच्या दौऱ्यावर असून, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. अमेरिका आणि इराण यांच्यातील अण्वस्त्राबाबतचा संघर्ष चर्चेनं सुटेल आणि शांतता प्रस्थापित होण्यास मदत मिळेल, असंही ते म्हणाले. या चर्चेसाठी ओमान मध्यस्थाची भूमिका बजावत असून, पहिली फेरी १२ एप्रिल रोजी ओम...

April 9, 2025 1:54 PM April 9, 2025 1:54 PM

views 10

अमेरिकेत चिनी मालाच्या आयातीवर आजपासून १०४ टक्के शुल्क लागू

अमेरिकेने चिनी मालाच्या आयातीवर आजपासून १०४ टक्के शुल्क लागू केलं आहे. व्हाईट हाऊसच्या जनसंपर्क मंत्री कॅरोलिन लेविट यांनी काल ही माहिती दिली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेनुसार, चीनला ३४ टक्के निर्यात शुल्क वाढीचा सामना करावा लागणार होता. मात्र चीनने अमेरिकन उत्पादनांवर लागू केलेलं शुल्क न हटवल्यानं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनला लागू होणाऱ्या शुल्कात ५० टक्के वाढ केली आहे. त्यामुळे चीनकडून अतिरिक्त ८४ टक्के शुल्क आकारलं जाईल. त्याचबरोबर युरोपियन महासंघासह इतर डझनभर द...

April 5, 2025 2:17 PM April 5, 2025 2:17 PM

views 15

डेन्मार्क आणि ग्रीनलंड यांनी एकजूट दाखवणं गरजेचं – डेन्मार्कच्या प्रधानमंत्री मेटे फ्रेडरिकसेन

अमेरिकेच्या वाढत्या दबावाला बळी न पडता आपल्या परस्पर हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी डेन्मार्क आणि ग्रीनलंड यांनी एकजूट दाखवणं गरजेचं आहे, असं मत डेन्मार्कच्या प्रधानमंत्री मेटे फ्रेडरिकसेन यांनी व्यक्त केलं आहे. अमेरिका ग्रीनलंड मध्ये दाखवत असलेल्या वाढत्या धोरणात्मक स्वारस्याला अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी दुजोरा दिल्याच्या पार्श्वभूमीवर फ्रेडरिकसेन यांनी हे विधान केलं आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ग्रीनलंड अत्यंत महत्वाचा असून अमेरिका आपल्या हिताचं रक्षण करेल, असं व्...

April 1, 2025 10:50 AM April 1, 2025 10:50 AM

views 15

येमेनमधील हुथी बंडखोरांवर अमेरिकेचे हल्ले धोका संपेपर्यंत सुरूच राहतील: राष्ट्राध्यक्ष ट्रम्प

अमेरिकेच्या जहाजांसाठी धोका असलेल्या येमेनमधील हुथी बंडखोरांची बंडखोरी थोपवण्यासाठी अमेरिकेचे हल्ले सुरू राहतील असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावरील संदेशांत दिला आहे. गेल्या दोन आठवड्यांतील सतत सुरु असलेल्या हल्ल्यांमुळे इराण समर्थित हुथी दहशतवाद्यांना रोखण्यात अमेरिकेला यश आलं आहे. असं ट्रंप यांनी म्हटलं आहे. अमेरिकेने १५ मार्च रोजी प्रमुख सागरी मार्गांवर केमेरीन बेटानजिक अमेरिकी जहाजांना धमकावण्यासाठी हुथी बंडखोरांनी हल्ले केले. याला प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्...

February 6, 2025 4:16 PM February 6, 2025 4:16 PM

views 7

अमेरिकेतून भारतीय नागरिकांना हद्दपार केल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांचा संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ

अमेरिकेतून भारतीय नागरिकांना हद्दपार केल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी गदारोळ केल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचं कामकाज आधी दुपारी बारा आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेचं कामकाज आज सकाळी सुरू होताच काँग्रेस, समाजवादी पक्षासह इतर विरोधी पक्षांनी अमेरिकेतूून भारतीय नागरिकांच्या हद्दपारीच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली, तसंच घोषणाबाजी केली. याआधी काँग्रेसने या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव मांडला. यावर हे प्रकरण परकीय राष्ट्राशी संबंधित असल्यामुळे सभागृह सुरळित चालू द्याव...

February 4, 2025 2:10 PM February 4, 2025 2:10 PM

views 15

अमेरिका आपले स्थलांतराचे कायदे आणखी कठोर करत असल्याचं अमेरिकेच्या दूतावासाकडून स्पष्ट

अमेरिका आपले स्थलांतराचे कायदे आणखी कठोर करत असल्याचं अमेरिकेच्या दूतावासानं म्हटलं आहे. अमेरिकेची लष्करी विमानं अवैध स्थलांतरितांना भारतात घेऊन जात असल्याचं वृत्त प्रसारित झालं होतं, त्या पार्श्वभूमीवर अमेरिकी दूतावासानं हे स्पष्ट केलं. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेतून हद्दपार करण्यात आलेली भारतीय नागरिकांची ही पहिली तुकडी आहे. अमेरिकेत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या स्थलांतरितांविरोधात कठोर पावलं उचलण्याचं आश्वासन ट्रम्प यांनी दिलं असून, याबाबतच्या अनेक...

February 3, 2025 2:26 PM February 3, 2025 2:26 PM

views 12

अमेरिकेमधून येणाऱ्या मालावर शुल्क आकारण्याचा कॅनडा आणि मेक्सिकोचा निर्णय

अमेरिकेमधून येणाऱ्या मालावर शुल्क आकारण्याचा निर्णय कॅनडा आणि मेक्सिको यांनी घेतला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा , मेक्सिको आणि चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे , त्याला प्रत्युत्तर म्हणून या दोन देशांनी हा निर्णय जाहीर केला आहे. अमेरिकेमधून आयात केल्या जाणाऱ्या ३० अब्ज डॉलर किमतीच्या मालावर २५ टक्के शुल्क आकारलं जाईल, असं कॅनडानं घोषित केलं आहे, मात्र मेक्सिकोनं अद्याप तपशील जाहीर केलेला नाहीत. अमेरिकी मालावर प्रत्युत्तरादाखल शुल्क आकारण...

January 16, 2025 10:45 AM January 16, 2025 10:45 AM

views 9

अमेरिकेने निर्यात नियंत्रण यादीतून भारताच्या तीन आण्विक संस्थांवरचे उठवले निर्बंध

अमेरिकेनं भारताच्या भाभा अणुसंशोधन केंद्र, भारतीय दुर्मीळ पृथ्वीविज्ञान केंद्र आणि इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र या तीन संस्थांवरचे निर्बंध उठवले आहेत. अमेरिकेच्या उद्योग आणि सुरक्षा विभागानं ही घोषणा केली. शीतयुद्धाच्या काळात लादण्यात आलेले हे निर्बंध अमेरिकेच्या परदेशी धोरण उद्दिष्टांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीनं हटवण्यात आल्याचं या विभागानं म्हटलं आहे. हे निर्बंध उठवल्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक संयुक्त प्रयत्नांना बळ मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्या...

September 30, 2024 6:42 PM September 30, 2024 6:42 PM

views 11

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची तैवानसाठी ५६७ दशलक्ष डॉलर्सची संरक्षण मदत मंजूर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तैवानसाठी ५६७ दशलक्ष डॉलर्सची संरक्षण मदत मंजूर केली आहे. संरक्षण सामग्री, सेवा तसंच लष्करी शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी ही मदत मंजूर केल्याची माहिती व्हाईट हाऊसच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे.