April 17, 2025 3:33 PM April 17, 2025 3:33 PM
6
अमरावतीमधून विमानसेवा सुरु झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांकडून आनंद व्यक्त
अमरावतीमधून विमानसेवा सुरु झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. अमरावती विमानतळ आणि उडान अर्थात उडे देश का आम नागरिक योजनेअंतर्गत अमरावती - मुंबई प्रवासी विमानसेवेचा काल प्रारंभ झाला. या पार्श्वभूमीवर सामाजिक माध्यमावरच्या संदेशात त्यांनी म्हटलं आहे की, या विमानतळामुळे या भागात अर्थव्यवस्थेला आणि दळणवळणाला चालना मिळेल.