September 24, 2024 8:18 PM September 24, 2024 8:18 PM
14
श्रीलंकेच्या प्रधानमंत्रीपदी हरिणी अमरसुर्या यांचा शपथविधी
श्रीलंकेचे नवीन प्रधानमंत्री म्हणून हरिणी अमरसुर्या यांनी आज शपथ घेतली. नॅशनल पीपल्स पॉवरच्या खासदार असलेल्या अमरसुर्या यांनी आज राष्ट्रपती सचिवालयात राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्यासमोर शपथ घेतली. दिसानायके यांनी कालच राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती. एनपीपीचे खासदार विजित हेरथ आणि लक्ष्मण निपुण अराची यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.