October 4, 2024 8:09 PM October 4, 2024 8:09 PM
10
तीन ऑक्टोबर हा दिवस मराठी अभिजात भाषा गौरव दिन’म्हणून साजरा हाेणार
तीन ऑक्टोबर हा दिवस यापुढे 'मराठी अभिजात भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. या संदर्भातील मंत्रिमंडळाचा ठराव मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी वाचून दाखवला. मराठी भाषा मुळातच अभिजात होती. तिला अभिजात दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्राने सनदशीर मार्गाने प्रयत्न केले. गेले दशकभर यासाठी अनेक स्तरांवर प्रयत्न करण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा तमाम मराठी भाषिकांना आनंद झाला आहे. तसंच मराठी भाषेच्या ...