June 18, 2025 3:13 PM June 18, 2025 3:13 PM
10
मुंबई- पुणे महामार्गावर भातण बोगद्यात सात ते आठ वाहनं एकमेकांवर आदळल्यामुळे अपघात
मुंबई- पुणे महामार्गावर भातण बोगद्यात आज सकाळी सात ते आठ वाहनं एकमेकांवर आदळल्यामुळे अपघात झाला. या अपघातात १० ते १२ पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना पनवेल इथं एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त वाहनांमध्ये तीन ते चार पोलिस गाड्या, एक एसटी महामंडळाची बस, एक टेम्पो, एक स्कॉर्पिओ आणि एक जीप यांचा समावेश आहे. या सर्व गाड्या मुंबईहून पुण्याकडे जात होत्या. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.