April 15, 2025 10:51 AM April 15, 2025 10:51 AM

views 14

बीड – आवादा कंपनीच्या पवनचक्की बांधणीच्या ठिकाणी झालेल्या चोरी प्रकरणी चार जणांच्या टोळीला अटक

बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यात सुरू असलेल्या आवादा कंपनीच्या पवनचक्की बांधणीच्या ठिकाणी झालेल्या चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल चार जणांच्या टोळीला अटक केली. त्यांच्याकडून ११ लाख ५८ हजार रूपयांचा मुद्देमाल आणि चारचाकी वाहन जप्त करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी दिली.

April 1, 2025 9:46 AM April 1, 2025 9:46 AM

views 17

बीड : प्रार्थनास्थळात स्फोट घडवून आणल्याप्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक

बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातल्या अर्धमसला इथं प्रार्थनास्थळात स्फोट घडवून आणल्याप्रकरणी विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे या दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना विशेष न्यायालयानं ३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, दहशतवाद विरोधी पथक आता या प्रकरणाचा समांतर तपास करणार आहे.

February 7, 2025 3:49 PM February 7, 2025 3:49 PM

views 14

अजिंठा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या गैरव्यवहार प्रकरणी बँकेचे अध्यक्ष सुभाष झांबड यांना अटक

अजिंठा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या गैरव्यवहारप्रकरणी काँग्रेसचे माजी विधान परिषद सदस्य आणि बँकेचे अध्यक्ष सुभाष झांबड यांना आज पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरात त्यांच्या घरातून अटक केली. ९७ कोटी ४१ लाख रुपयांच्या या घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर वर्षभरापूर्वी गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून झांबड फरार होते. या प्रकरणी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता.

November 12, 2024 2:25 PM November 12, 2024 2:25 PM

views 10

अवैधरीत्या सोनं आणणाऱ्या प्रवाशाला सीमाशुल्क विभागानं केली अटक

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर अवैधरीत्या सोनं आणणाऱ्या प्रवाशाला सीमाशुल्क विभागानं काल अटक केली. दुबईतून आलेल्या या प्रवाशाकडून ३ सोन्याची बिस्किटं जप्त करण्यात आली. तीन किलोग्रॅम वजनाच्या या सोन्याची किंमत दोन कोटी २७ लाख इतकी आहे. कपड्यांच्या खिशात लपवून त्यानं हे सोनं आणलं होतं.  

November 10, 2024 2:01 PM November 10, 2024 2:01 PM

views 5

कॅनडात हिंदू मंदिराच्या परिसरात झालेल्या हिंसाचारा प्रकरणी आणखी एकाला अटक

कॅनडात अलिकडेच ब्रॅम्प्टन इथं हिंदू मंदिराच्या परिसरात झालेल्या हिंसाचारा प्रकरणी तिथल्या पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. कॅनडाच्या प्रशासनानं या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक स्थापन केलं आहे.