January 16, 2025 9:40 AM January 16, 2025 9:40 AM
3
अजिंठा – वेरुळ चित्रपट महोत्सवाने मराठवाड्यातल्या तरुणाईला सिनेसाक्षर केलं – सई परांजपे
अजिंठा - वेरुळ चित्रपट महोत्सवानं मराठवाड्यातल्या तरुणाईला सिने साक्षर केल्याचं ज्येष्ठ लेखिका, नाटककार, निर्मात्या सई परांजपे यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं दहाव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं काल उद्घाटन झालं. एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात झालेल्या या सोहळ्यात यंदाचा पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार परांजपे यांना प्रदान करण्यात आला, त्यानंतर त्या बोलत होत्या. ‘‘आजवर मी केलेल्या कामगिरीची उशीरा का होईना पण दखल घेतली, आणि आज मला हा मोठा सुंदर सन्मान मिळवून दिला, त्...