ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातल्या ८०० एकर जागेचं पर्यावरणीय पुनरूज्जीवन वन विभाग लवकरच करणार असून या प्रकल्पाला झिरोधा कंपनी आणि रेनमॅटर फाऊंडेशन आर्थक सहाय्य करणार आहेत. जंगल, गवताळ प्रदेश किंवा जलक्षेत्रात मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवून तेथील नैसर्गिक भूभाग, वन्यजीव आणि जैवविविधतेचं पुनरूज्जीवर या प्रकल्पाद्वारे केलं जाणार आहे. यासाठी झिरोधा कंपनीकडून शंभर कोटींचा झिरोधा रिवाइल्डिंग निधी उभारण्यात आला आहे. विदर्भातील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी रिवाइल्डिंगसारखे प्रकल्प उपयुक्त आहे. अशा कामांमध्ये झिरोधा सारख्या कार्पोरेट कंपन्या सहभागी होत असून हा पर्यावरणपूरक उपक्रम केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर देशातील कॉर्पोरेट क्षेत्रासाठीही एक आदर्श ठरणार आहे. राज्य सरकार आणि वन विभागासोबतचं हे सहकार्य फलदायी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
Site Admin | November 22, 2025 7:20 PM | tatoba
ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातल्या ८०० एकर जागेचं पर्यावरणीय पुनरूज्जीवन लवकरच होणार