कतारमध्ये सुरु असलेल्या जागतिक टेबल टेनिस विश्वविजेतेपद स्पर्धेत भारताच्या दिया चितळे आणि यशस्विनी घोरपडे यांनी महिला दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्यांनी सिंगापूरच्या जोडीचा पराभव केला. पुढील फेरीत त्यांचा सामना जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या जपानी जोडीशी होणार आहे. तर अहिका मुखर्जी आणि सुतीर्थ मुखर्जी यांना पराभव पत्करावा लागला.