भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज ओदिशात कटक इथल्या बाराबती मैदानावर सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. भारताची सुरुवात खराब झाली. सामन्यातल्या तिसऱ्याच चेंडूवर शुभमन गिल ४ धावा काढून बाद झाला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या १४ षटकात ५ बाद १०४ धावा झाल्या होत्या. लुंगी नगिदीनं ३ गडी बाद केले. भारताच्या एकाही फलंदाजाला अर्थशतक झळकवता आलेलं नाही.
पाच सामन्यांच्या या मालिकेतला दुसरा सामना येत्या गुरुवारी चंदीगडमधे, तिसरा सामना धर्मशाळा इथं, चौथा लखनऊमध्ये, आणि शेवटचा सामना अहमदाबादमधे होणार आहे.