दृष्टिहीन महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा आठ खेळाडू राखून पराभव केला. स्पर्धेतला हा भारताचा सलग पाचवा विजय ठरला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं, मेहरिन अली हिच्या ६६ धावांच्या खेळीच्या जोरावर सर्वबाद १३५ धावा केल्या. भारतानं पाकिस्तानचे सात खेळाडू धावबाद केले.
त्यानंतर विजयासाठीचं १३६ धावांचं आव्हान भारतानं केवळ १० षटकांत दोन खेळाडूंच्या मोबदल्यात पार केलं. भारताच्या वतीनं अनेखा देवी हीनं सर्वाधिक ६४ धावा केल्या. अनेखा हिलाच सामनावीराच्या किताबानं गौरवलं गेलं.