पहिल्यावहिल्या दिव्यांग महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकासाठी भारताने सोळा जणांचा संघ जाहीर केला आहे. या संघाचं नेतृत्व कर्णधार दीपिका टी सी ही करेल.
तर उपकर्णधारपदाची धुरा महाराष्ट्राची गंगा कदम सांभाळणार आहे. ११ ते २५ नोव्हेंबर दरम्यान नवी दिल्ली आणि बंगळुरू इथं ही स्पर्धा होईल. यात भारतासह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि अमेरिका हे संघ सहभागी होतील.