डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा झिंबाब्वेवर निर्णायक विजय

झिंबाब्वेमधे हरारे इथं आज झालेल्या चौथ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं झिंबाब्वेवर १० गडी राखून विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला, आणि झिंबाब्वेचा डाव १५२ धावांवर संपुष्टात आणला. झिंबाब्वेचा कर्णधार सिंकदर रझानं सर्वाधिक ४६ धावा केल्या. भारतातर्फे खलिल अहमदनं २, तर तुषार देशपांडे, वाशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा, आणि शिवम दुबे, यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. 

भारतानं विजयी लक्ष्य एकही गडी न गमावता १६ व्या षटकातच पार केलं. यशस्वी जयस्वालनं नाबाद ९३, शुभमन गिलनं नाबाद ५८ धावा केल्या. १५ षटकं आणि २ चेंडूत भारतानं १५६ धावा केल्या. 

या विजयामुळे  पाच सामन्यांच्या मालिकेत भारतानं ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे उद्या होणारा या मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना औपचारिक ठरणार आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.