डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

December 11, 2024 7:52 PM | SyriaCrisis

printer

अनेक दिवसांच्या संघर्षानंतर सिरीयाची राजधानी दमास्कस येथील जनजीवन पूर्ववत

अनेक दिवसांच्या संघर्षानंतर सिरीयाची राजधानी दमास्कस येथील जनजीवन पूर्ववत होत असून लोक त्यांच्या दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडत आहेत, असं सिरीयाचे हंगामी प्रधानमंत्री मोहम्मद अल बशीर यांनी सांगितलं. बाहेर देशात गेलेल्या सिरीयन नागरिकांना परत आणणं ही आपली प्राथमिकत आहे असं बशीर म्हणाले. देशात स्थैर्य आणि शांतता प्रस्थापित करण्याची गरज असल्याचं अधोरेखित बशीर यांनी बशर अल असद यांच्या राजवटीतल्या अधिकाऱ्यांनाही सोबत घेऊन सार्वजनिक सेवा आणि संस्थांंचं कामकाज सुरळीत करू असं सांगितलं.  दरम्यान, मागील ४८ तासांत इस्रायलने सिरीयाच्या लष्करी छावण्यांवर हल्ले सुरू केले आहेत.